शाहूनगर : गोडोली येथे आज दुपारी साईबाबा मंदिर चौकात पिसाळलेल्या भटक्या श्वानाने पाच ते सहा जणांना चावा घेतल्याची घटना घडली. या घटनेने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून, नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. नागरिकांनी पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून देखील काही उपयोग झाला नाही. त्यामुळे पालिकेच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे.