esakal | Corona Virus : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर; वाईत कडक Lockdown

बोलून बातमी शोधा

Wai City

Corona Virus : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर; वाईत कडक Lockdown

sakal_logo
By
भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण वाई शहर आजपासून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले. त्यामुळे शहरात कोणाही बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश मिळणार नाही, अथवा कोणाही व्यक्तीला शहरातून बाहेर पडता येणार नाही. पुढील आदेश होईपर्यंत शहरातील सर्व आस्थापना, दुकाने, व्यवसाय पूर्णतः बंद राहणार आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी दिली.

पालिका हद्दीत व परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनासंदर्भातील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी बाधित रुग्ण व त्यांच्या अतिजोखीम संपर्कातील व्यक्तींचा संपूर्ण शहरात वावर झालेला असल्याने प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी संपूर्ण शहराच्या चारही बाजूच्या सीमा बंद करणे आवश्‍यक असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानुसार आजपासून संपूर्ण शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे.

सातबारा उताऱ्यासाठी लाच घेताना तलाठी जाळ्यात; मसुरात 'लाचलुचपत'ची धडक कारवाई

त्यासाठी पालिका प्रशासनाकडून यासंदर्भातील अटी-शर्ती, तसेच घ्यावयाची काळजी याबाबतची माहिती देण्यासाठी दोन दिवसांपासून शहरात रिक्षाद्वारे व टीमद्वारे जागृती करण्यात आली आहे. नागरिकांची जीवनावश्‍यक वस्तू, तसेच दैनंदिन गरजांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी पालिकेने विविध समित्या स्थापन केलेल्या आहेत. प्रत्येक प्रभागासाठी त्या- त्या प्रभागातील नगरपालिका सदस्य, काही स्वयंसेवक आणि नगरपालिकेने नेमलेले नियंत्रण अधिकारी यांची प्रभागस्तरीय समिती स्थापली आहे. सर्व जीवनावश्‍यक वस्तूंची घरपोच सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

एकनाथ गायकवाड Visiting Card वरील नावासमोर 'कोंडवेकर' हा शब्द लिहायचेच!

वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे संपूर्ण शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रांताधिकारी यांच्या आदेशानुसार सर्व दुकाने, आस्थापना बंद राहणार आहेत. कोणालाही वैद्यकीय मदत लागल्यास पालिकेतील आपत्ती निवारण कक्ष अथवा संबंधित प्रभागांचे नगरसेवक यांना संपर्क केल्यास तत्काळ सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाईल. नागरिकांनी कोणत्याही कारणास्तव घरातून बाहेर पडू नये.

-विद्यादेवी पोळ, मुख्याधिकारी

Edited By : Balkrishna Madhale