सतोबा डोंगरावर पोलिसांचा कडक बंदोबस्त; भाविकांना आल्यापावली पाठवलं परत

Dahiwadi Police
Dahiwadi Policeesakal
Summary

टाकेवाडी (ता. माण) येथील श्री सतोबाचा डोंगर भाविकांविना सुनासुना होता.

दहिवडी (सातारा) : 'डोंगरच्या हरीचं चांगभलं'चा गजर यंदा घुमलाच नाही. टाकेवाडी (ता. माण) येथील श्री सतोबाचा डोंगर (Satoba Mountain) भाविकांविना सुनासुना होता. दहिवडी पोलिसांनी (Dahiwadi Police) कडक बंदोबस्त ठेवल्यामुळे फक्त मानकरी व पुजाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी संपन्न झाला. धनगर समाजाचे (Dhangar Community) आराध्य दैवत असलेल्या श्री सतोबाची यात्रा शनिवार १६ ऑक्टोबर रोजी होती. परंतु, प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश लागू केले होते.

सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस यंत्रणेने कडक बंदोबस्त ठेवला होता. स्थानिक देवस्थानचे विश्वस्त, मानकरी व पुजारी यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले. मराठवाड्यासह लांबवरून येणाऱ्या ज्या भाविकांना यात्रा रद्द झाल्याचे माहिती नव्हते ते डोंगराच्या दिशेने देवाच्या दर्शनाच्या ओढीने येत होते. परंतु, ठिकठिकाणी असलेल्या पोलीस बंदोबस्तामुळे भाविकांची निराशा होत होती.

Dahiwadi Police
चर्च-ख्रिश्चन मिशनऱ्यांवर सरकारची करडी नजर; धर्मांतर केल्यास होणार कारवाई

अनेक भाविक दर्शनासाठी पोलिसांना गयावया करत होते. परंतु, आदेश असल्यामुळे पोलिस त्यांना आल्यापावली परत पाठवत होते. काही भाविक मात्र दुरुनच श्री सतोबाच्या शिखराचे दर्शन घेवून तिथेच धार्मिक विधी करुन तिथूनच माघारी परतताना दिसत होते. या सर्व परिस्थितीमुळे यात्रा काळात भाविक भक्तांच्या गर्दीने गजबजून जाणाऱ्या श्री सतोबा डोंगर परिसरात यावर्षी सुध्दा शांतता होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com