
-फिरोज तांबोळी
गोंदवले : सुख-दुःखात कायम सोबत राहण्याचा शालेय जीवनात केलेला संकल्प मित्राच्या मृत्यूनंतरही गोंदवल्यातील वर्गमित्रांनी जपून ‘ही दोस्ती तुटायची नाय’चा संदेशच दिला आहे. अल्पभूधारक शेतकरी वर्गमित्राच्या आकस्मित निधनानंतर या वर्गमित्रांनी ७० हजार रुपयांची मुदतठेव पावती देऊन केलेल्या मदतीने कुटुंबीयांच्या डोळ्याच्या कडा कृतज्ञतेने पाणावल्या. मित्राच्या मृत्युपश्चात कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून वाहिलेल्या या अनोख्या श्रद्धांजलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.