esakal | शेतीतील नवनव्या प्रयोगातून शेणोलीत विद्यार्थ्याची लाखाेंची कमाई
sakal

बोलून बातमी शोधा

शेतीतील नवनव्या प्रयोगातून शेणोलीत विद्यार्थ्याची लाखाेंची कमाई

युवराज कणसे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देऊन उसाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन केले. त्या फलस्वरूप 400 फूट लांब व 115 फूट सहा इंच क्षेत्रफळ असणाऱ्या 42 गुंठे शेतीत त्यांनी 107 टन उत्पन्न घेतले. त्याच क्षेत्रात ते जोड ओळ पद्धतीने केळीची लागवड करणार आहेत.

शेतीतील नवनव्या प्रयोगातून शेणोलीत विद्यार्थ्याची लाखाेंची कमाई

sakal_logo
By
अमोल जाधव

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : बीएस्सी अग्री पदवीच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या शेणोली येथील युवराज माणिकराव कणसे या विद्यार्थ्याने शिक्षण घेत शेतीतही आधुनिक शेतीचा धडा तितकाच अभ्यासूपणे गिरवला आहे. पारंपरिक ऊसशेतीत त्याने पाटपाण्याऐवजी ठिबक सिंचनाद्वारे व्यवस्थापन केले. परिणामी 43 गुंठ्यांत उसाचे 107 टन उत्पादन घेतले. याचबरोबर पीकबदल करत कलिंगड पिकाकडे ते वळले. या पिकाच्या ऐन हंगामात लॉकडाउन सुरू झाले. आलेल्या संकटाला सामोरे जात 43 टन कलिंगडाची हातविक्री करत अडचणीतील शेतीचे अर्थशास्त्र पेलले.
 
शेणोली येथील प्रतिष्ठित नागरिक माणिकराव गणपती कणसे यांचे युवराज हे चिरंजीव. युवराज हे रेठरे बुद्रुकच्या जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकत आहेत. शिक्षण घेतच ते शेतीचा व्याप पाहतात. कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी शेतीत नवनवे प्रयोग राबवण्याचा प्रयत्न सुरू केला. महाविद्यालयात आधुनिक शेती तंत्राचे धडे प्रत्यक्ष शेतीतही राबवण्याचा त्यांच्या प्रयत्नांना इस्लामपूर येथील कृषी पदवीधर विजय जाधव व वडील माणिकराव यांच्या मार्गदर्शनाची साथ मिळाली. युवराजचे वडील माणिकराव यांना विहीर बागायत नऊ एकर शेती आहे. त्यात सहा एकर शेती डोंगर उतारास आहे. त्या क्षेत्रास साडेचार किलोमीटर पाइपलाइनद्वारे पाणी नेले आहे. उर्वरित तीन एकर शेती गावालगत आहे. 

गृहराज्यमंत्र्यांनी काळजी व्यक्त करताच वाहनधारकांकडून 36 लाखांचा दंड वसूल

युवराज यांनी पारंपरिक शेतीला फाटा देऊन उसाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन केले. त्या फलस्वरूप 400 फूट लांब व 115 फूट सहा इंच क्षेत्रफळ असणाऱ्या 42 गुंठे शेतीत त्यांनी 107 टन उत्पन्न घेतले. त्याच क्षेत्रात ते जोड ओळ पद्धतीने केळीची लागवड करणार आहेत. याबरोबर त्यांनी 73 गुंठे क्षेत्रात गेल्या वर्षी कलिंगडाची लागवड केली. महाविद्यालयातील दैनंदिन वर्ग करतच या पिकात लक्ष दिले. त्यासाठी वेळेचे काटेकोर पालन केले. कलिंगडे पिकाची काढणी सुरू होणार तोच लॉकडाउन सुरू झाले. विक्री व्यवस्था टप्प झाल्याने हातविक्रीद्वारे अडचणीवर मात करण्याचे साहस दाखवले. उत्पादित कलिंगडे ट्रॅक्‍टरमधून आसपासच्या गावात जाऊन हातविक्री केली. प्रतिकिलोस सरासरी सहा रुपये दर मिळाला. 73 गुंठ्यांत 43 टन माल निघाला. विक्रीपश्‍चात दोन लाख 63 हजार रुपये मिळाले. या पिकाच्या काढणीनंतर यंदा 5 बाय 6 अंतरावर 21 ऑगस्टला जी-9 केळीची गादीवाफ्यावर मल्चिंग पेपरवर 2 हजार 200 रोपांची लावण केली आहे. दररोज प्रमाणानुसार खत व्यवस्थापन करत आहेत. 

कदमांचा प्रामाणिकपणा; बॅंक ऑफ महाराष्ट्रात सापडलेले सोन्याचे दागिने, पैसे केले परत

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top