Dahiwadi Police Station: 'दहिवडी पोलिस ठाणे जिल्ह्यात प्रथम'; मोबाईल हस्तगत करण्यात यशस्वी, प्रशस्तिपत्र देऊन सन्मान

Successful Mobile Recovery: पोर्टलच्या साहाय्याने गहाळ झालेले मोबाईल हे राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हैदराबाद, जामखेड, उस्मानाबाद, सांगली, पंढरपूर, मुंबई, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर येथून परत मिळविण्यात आले. जानेवारी २०२५ ते आजअखेर एकूण १५ लाख ४० हजार रुपये किमतीचे ७७ मोबाईल हस्तगत करून ते परत करण्यात आले आहेत.
Dahiwadi Police Station honored with a certificate for becoming the first in the district to successfully recover a stolen mobile.

Dahiwadi Police Station honored with a certificate for becoming the first in the district to successfully recover a stolen mobile.

Sakal

Updated on

दहिवडी: येथील पोलिस ठाणे हे सीईआयआर पोर्टलचा वापर करून मोबाईल हस्तगत करण्यात सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. याबद्दल सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे व पोलिस कॉन्स्टेबल नीलेश कुदळे यांचा पोलिस अधीक्षक तुषार दोशी व अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com