
Maharashtra’s Sudeshna Shivanakar celebrates her golden hat-trick in the 100m sprint at the Telangana National Athletics Championship.
Sakal
सातारा : वारंगळ (तेलंगण) येथे सुरू असलेल्या खुल्या राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत २३ वर्षांखालील गटात साताऱ्यातील सुदेष्णा हणमंत शिवणकरने १०० मीटर धावण्यात सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत तिने ११.६६ अशी वेळ नोंदविली. सुदेष्णाने वर्षातील तीन महत्त्वाच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची हॅट्ट्रिक साधली आहे.