कुडाळ : प्रचाराहून परतताना भाजपचे उमेदवार सुधीर चव्हाण यांचे निधन | Sudhir Chavan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sudhir Chavan

कुडाळ : प्रचाराहून परतताना भाजपचे उमेदवार सुधीर चव्हाण यांचे निधन

कुडाळ : येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग १६ एमआयडीसीमधीन भाजपचे उमेदवार सुधीर अनंत चव्हाण (Sudhir Chavan) (वय-४०) यांचे काल रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने (Heart Attack) निधन झाले.

चव्हाण हे भाजपच्या तिकिटावर कुडाळ नगरपंचायतची (Kudal Municipality) प्रभाग १६ मधून निवडून लढवत होते. काल रात्री ११.३० वाजता आपल्या प्रभागातील प्रचार आटपून ते कुडाळमधील भाजपच्या कार्यालयात आले. तेथून पुन्हा कामानिमित्त ज्याठिकाणी गेले त्याच ठिकाणी त्यांना अचानक ह्रदयविकाराचा तीव्र धक्का आल्याने ते खाली कोसळले. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

हेही वाचा: दहावीच्या परीक्षेचे तत्कालिक वेळापत्रक जाहीर, परीक्षा होणार लवकर

कुडाळमधील खाजगी दंत चिकित्सकांना कृत्रिम दात पुरवठा करण्याचा त्यांचा व्यवसाय होता. मुळचे आडवण येथील चव्हाण हे गेली काही वर्षे कुडाळात व्यवसायानिमित्त स्थायिक झाले होते. ते उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून ओळखले जात. त्यांचा मालवण तसेच कुडाळमध्ये मोठा मित्र परिवार होता. क्रिकेट अप्रतिम खेळायचे. त्यामुळे कुडाळात त्यांचा मोठा मित्र परिवार होता. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई असा परिवार आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sataradeath
loading image
go to top