

Maharashtra Sugarcane Crushing Season Raju Shetti Opposes October 15 Start Announces Hubballi Farmers Protest
sakal
सातारा : राज्य सरकारने यंदाचा ऊस गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे २९ सप्टेंबरला कर्नाटकातील हुबळी येथे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करणार आहे, तसेच सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास कारखाने बंद पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला. साखरेचा साठा संपत आल्याने केंद्राच्या दबावातून कारखाने लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.