

Labourer Hacked to Death, Body Hidden in Sugarcane Field
Sakal
कोरेगाव : ऊसतोडणी मजुराचा जेवणाचे आमिष दाखवत भोसे (ता. कोरेगाव) येथे निर्घृण खून करून मृतदेह उसाच्या फडात टाकल्याची घटना उघडकीस आली. जरंडेश्वर शुगर मिलच्या स्लीप बॉयने हे कृत्य केल्याची तक्रार आज येथील पोलिस ठाण्यात दाखल झाली असून, मच्छिंद्र अंबादास भोसले (वय ४१) असे मृताचे नाव आहे.