

Protest News
esakal
इटकरे, : साखर कारखान्यांच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊसदराच्या प्रश्नावरून वाळवा तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन तीव्र केले आहे. शेतकऱ्यांना उसाची पहिली उचल प्रतिटन पाच हजार रुपये मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, ऊसदर जाहीर केल्याशिवाय, शेतकऱ्यांना योग्य पहिली उचल मिळाल्याशिवाय ऊस वाहतूक सुरू ठेवण्यास विरोध असल्याची भूमिका घेतली.