
Karad police file FIR against 12 after sword attack in Sumangalnagar.
कऱ्हाड: घराचे बांधकाम सुरू असताना खाली टाकलेला कचरा अंगावर पडल्याच्या कारणावरून गोळेश्वर (ता. कऱ्हाड) येथील सुमंगलनगर परिसरात दोन गटांत मारामारी झाली. दोन्ही गटांतील युवकांनी यावेळी तलवार, कोयत्याने एकमेकास मारहाण केली. त्यात तिघे जण जखमी झाले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या. दोन्ही गटांतील १२ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.