Motivation News : पाचवेळा हुलकावणी, सहाव्यावेळी थेट आयपीएस; कऱ्हाडच्या सुमित तावरेच्या जिद्दीची कहाणी

मनात जिद्द आणि संयम असला तर काहीही साध्य करता येते हे कऱ्हाड (जि.सातारा) येथील सुमित तावरे या युवकाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळवुन दाखवुन दिले.
ips sumit taware
ips sumit tawaresakal

कऱ्हाड - मनात जिद्द आणि संयम असला तर काहीही साध्य करता येते हे कऱ्हाड (जि. सातारा) येथील सुमित तावरे या युवकाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळवुन दाखवुन दिले आहे. सलग पाच वेळा यशाने हुलकावनी दिल्याने खचुन न जाता सहाव्या वेळी फिनीक्स भरारी घेत मोठ्या जिद्दीने सुमितने देशातुन साडेसहा लाख विद्यार्थ्यांतुन ६५५ वी रॅंक पटकावुन आयपीएस पदाला गवसणी घालत तरुणांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

सुमित याचे मुळगाव मायणी आहे. मात्र त्याचे वडील सातारा जिल्हा सहकारी बॅंकेत नोकरीस होते. त्यामुळे ते कऱ्हाडला स्थायिक झाले. सुमीतचे पहिली ते चौथीपर्यतचे शिक्षण येथील नुतन मराठी शाळेत, पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण टिळक हायस्कुलला तर अकरावी आणि बारावी ही येथील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमधुन झाले.

त्यानंतर त्याने सीईटी परिक्षेत चांगली मार्क मिळवुन पुण्याच्या सीईओपी कॉलेजला इंजिनीयरींगसाठी प्रवेश मिळवला. तेथेच त्याचा स्पर्धा परिक्षेचा श्रीगणेशा झाला. त्या कॉलेजमधुन त्याने पदवी पुर्ण केल्यानंतर पुण्यातच स्पर्धा परिक्षेची तयारी सुरु केली.

त्यावेळी त्याला आई-वडील, भाऊ, बहिण आणि दाजी यांच्यासह आयपीएस गिरीश यादव, तुषार देसाई, अमर राऊत, अभयसिंह देशमुख, मनोज महाजन यांनी मार्गदर्शन केले. त्याने पाच वेळा यापुर्वी परिक्षा दिली. मात्र त्याला यश आले नाही. एकदा दर मेनची परिक्षा पास होवुन मुलाखतीत त्याला अपयश आले. त्यावेळी हे क्षेत्र सोडुन दुसरे काही तरी करावे असे त्याच्या मनात आले.

मात्र मनाला मुरड घालुन त्याने कुटुंबीय आणि मित्रांच्या पाठिंब्याने सहाव्यावेळी चांगली तयारी करुन परिक्षा द्यायची ठरवले. त्यावेळी त्याने दिवसरात्र एक करुन काहीही करुन यश मिळवायचेच या इराद्याने परिक्षेचा अभ्यास केला. त्यात त्याला यश मिळाले. त्यानंतर त्याने मुलाखतीतही चांगले यश मिळवल्याने त्याने देशातील साडेसहा लाख विद्यार्थ्यांमधुन ६५५ वी रॅंक पटकावुन सनदी अधिकारी पदावर नावर कोरले आहे.

क्लासविना स्वअभ्यासातुन मिळवले यश

स्पर्धा परिक्षा म्हंटले की लाखो रुपये फी भरुन महागडे क्लास लावायचे हा ट्रेंड रुढ झाला आहे. त्यासाठी पुणे, दिल्लीत अनेकजण महागडे क्लास लावतात. त्यातुन अनेक विद्यार्थी केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यशस्वीही झाले आहेत. मात्र क्लास न लावताही स्वः अभ्यासातुनही यश मिळवता येते हे कऱ्हाडच्या सुमित तावरे याने दाखवुन दिले आहे. त्याने पुण्यात आणि दिल्लीत राहुन एकही क्लास न लावता स्वतः अभ्यास करुन हे यश मिळवुन अन्य विद्यार्थ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला स्पर्धा परिक्षेत यश मिळवणे हे जमणारच नाही असा ट्रेंड आहे. मात्र जिद्दीने, चिकाटीने अभ्यास करुन प्रयत्न केल्यास काहीही असाध्य नाही. मला तर पाचवेळा अपयश आले. त्यामुळे खचुन न जाता मी सहाव्यावेळी जिद्दीने परिक्षा देवुन देशात ६५५ वी रॅंक पटकवली. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांनी स्पर्धा परिक्षांना सामोरे गेले पाहिजे. प्रामाणिक प्रयत्न केल्यावर निश्चीत यश मिळते.

- सुमित तावरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com