

Sunetra Pawar and Supriya Sule Together at Preeti Sangam Their Joint Presence Sparks Political Discussions in Maharashtra
esakal
-हेमंत पवार
कऱ्हाड: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या दोघीही दाखल झाल्या. विशेष म्हणजे, दोघींचे आगमन टप्प्याटप्प्याने झाले असले, तरी काही काळ त्यांनी एकत्रित भजन कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यामुळे प्रीतिसंगमावरील या भेटीची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा रंगली.