सातारा : लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीवेळी रामराजे नाईक- निंबाळकर हे पक्षाच्या भूमिकेपासून थोडे बाजूला गेले. त्यांना डावलण्याचा हेतू नसून त्यांना परत आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.