
Superstition claims yet another life – society questions: How many more victims?”
Sakal
एकविसाव्या शतकातही अंधश्रद्धेची पाळेमुळे किती घट्ट आहेत. याचे उदाहरण माण तालुक्यातील मार्डी येथे अंधश्रद्धेच्या प्रकारातून नातवाने आजीचा खून केल्याने समोर आले. अंधश्रद्धेला किरकोळ समजणाऱ्या समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम या घटनेने अधोरेखित केले आहे. अंधश्रद्धेविरोधात कायदा असला, तरी ती पूर्णपणे हद्दपार झाली नसल्याचेच अशा घटनांतून स्पष्ट होते. त्यामुळे आणखी किती बळी गेल्यावर समाज, सरकार जागे होणार आहे.
-संजय शिंदे