
कऱ्हाड: घरगुती गॅसचा व्यावसायिक वापरासाठी तालुक्यात काही ठिकाणी वापर होत होता. त्याची माहिती मिळाल्यावर तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेने आत्तापर्यंत नऊ ठिकाणी १२ जणांवर कारवाई केली आहे. संबंधितांकडून ३२ सिलिंडर जप्त केल्याची माहिती प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी आज दिली.