सातारा : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवार यांनी कोणत्या संदर्भाने वक्तव्य केलेय हे पहावे लागेल. परंतू दोन्ही गट एकत्र आणण्याबाबत मी एकटी निर्णय घेऊ शकत नाही. यासंदर्भात कार्यकर्त्यांशी बोलावे लागणार आहे. सर्वांशी चर्चा करुन मगच निर्णय घेतला जाईल, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी साताऱ्यात दिली. दरम्यान, भारत-पाक युद्धजन्य परिस्थितीत एक जबाबदार भारतीय म्हणून आम्ही पूर्ण ताकतीने भारत सरकार व भारतीय सैन्याच्या पाठीशी आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.