

Bar-headed geese, known as the ‘Himalayan Airline’, spotted at Suryachiwadi wetland.
sakal
-अंकुश चव्हाण
कलेढोण: जगातील सर्वाधिक उंचीवरचे शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवरून झेप घेणारा, सलग सतरा तास अथक हवाई अंतर कापणारा ‘द हिमालयीन एअरलाईन’ अर्थात बार हेडेड गूज (मराठीत पट्टेरी हंस) या १६ परदेशी पक्ष्यांनी सूर्याचीवाडी (ता. खटाव) येथे आगमन केले आहे. वाढत्या थंडीमुळे खटाव तालुक्यातील मायणी, कानकात्रे, सूर्याचीवाडी व येरळवाडी ब्रिटिशकालीन तलावात परदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन होत असून, पक्षीनिरीक्षकांची पावले या तलावाकडे वळू लागली आहेत.