

Panchgani Drug Bust: Court Sends Suspects to Police Remand
Sakal
भिलार: पाचगणी येथे कोकेन तस्करीप्रकरणी अटक केलेल्या १० संशयितांना आज पोलिसांनी वाई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या कारवाईनंतर पाचगणी पोलिसांनी आता पर्यटन क्षेत्रातील हॉटेल आणि लॉज मालकांना कडक सूचना दिल्या आहेत.