sakal
सातारा: सातारा पालिकेच्या निवडणुकीसाठीच्या रणधुमाळीस सुरुवात झाली असून, यंदाही जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडून द्यायचा असल्याने अनेकांनी त्यासाठीचे शड्डू ठोकले आहेत. सर्वसाधारणसाठी नगराध्यक्षपद खुले असल्याने अनेक इच्छुकांपैकी नेमक्या योग्य उमेदवाराची निवड करण्याच्या दिव्याला साताऱ्यातील दोन्ही आघाडीच्या प्रमुखांना सामोरे जावे लागणार आहे. या पदाच्या उमेदवारीसाठी नेत्यांनी नकार दर्शविल्यास ऐनवेळी तारांबळ टाळण्यासाठी अनेक इच्छुकांनी प्रभागात देखील साखरपेरणी सुरू केल्याचे दिसून येत आहे.