esakal | शेती अवजारांत फसवणाऱ्यांची चौकशी करा! स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Swabhimani Shetkari Sanghatana

राज्य सरकार व कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांनी पंचायत समितीत प्रस्ताव पाठविल्यानंतर अनुदानावर शेतीची अवजारे मिळतात.

सातारा: शेती अवजारांत फसवणाऱ्यांची चौकशी करा

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा: अनुदानातून मिळणाऱ्या अवजारांमध्ये शेतकऱ्यांची दुकानदार फसवणूक करत असल्याचा प्रकार दै. ‘सकाळ’ने समोर आणला. या प्रकरणात संबंधित अधिकारी व दुकानदार यांच्यात संगनमत असून, ठराविक दुकानांतून अवजारे घेण्याची सक्ती केली जाते. अवजारे खरेदी केलेल्या दुकानदारांच्या बिलांचे व्हाऊचर तपासून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दुकानदार व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून दोषी दुकानदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेळके यांनी केली आहे.

हेही वाचा: सातारा: भूस्खलनग्रस्तांचे पुनर्वसन आले टप्‍प्यात

राज्य सरकार व कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांनी पंचायत समितीत प्रस्ताव पाठविल्यानंतर अनुदानावर शेतीची अवजारे मिळतात. मात्र, या अनुदानित योजनांमध्ये अवजार विक्रेते दुकानदार फसवणूक करून खराब व दर्जाहीन अवजारे शेतकऱ्यांच्या माथी मारत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. यामध्ये, शेतकऱ्यांनी घेतलेल्या कुट्टी मशिनच्या अंतर्गत भागात लोखंडी रॉडही खराब असून, मशिनची मोटारही आठवड्याच्या आत जळाल्याचे काही ठिकाणी आढळून आले आहे. दुकानदार शेतकऱ्यांना जुमानत नसल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे. याचबरोबर, खराब लागलेले अवजारांचे पार्टही बदलून दिले जात नसल्याने शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी चौकशी करून दोषी दुकानदारांना काळ्या यादीत टाकावे, अशीही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

हेही वाचा: सातारा : डेंग्युच्या पार्श्वभुमीवर घरोघरी सर्व्हे

तक्रारींसाठी पुढे या....

अनुदानातून अवजारे खरेदी करताना दुकानदारांकडून फसवणूक होत झालेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याबाबत फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी तक्रार करण्याचे आवाहन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांनी केले आहे. त्यामुळे खराब व दर्जाहीन अवजारे मिळालेल्या शेतकऱ्यांनी तक्रारीसाठी पुढे यावे.

‘‘शासनाच्या योजनेला काळिमा फासण्याचे काम दुकानदार करत आहेत. केवळ टक्केवारी मिळवून शेतकऱ्यांना लुटण्याचे काम अधिकारी व दुकानदार करतात. शेतकऱ्याला अवजारे खरेदीसाठी स्वायत्तता असूनही ठराविक दुकानांमध्येच योजना सुरू असल्याचे खोटे सांगितले जाते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अन्यथा पुढील काही दिवसांत संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.’’

- राजू शेळके, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

loading image
go to top