पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत साता-यातील क्रीडापटूंसह रसिकांसाठीच्या सुविधा खूल्या

पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत साता-यातील क्रीडापटूंसह रसिकांसाठीच्या सुविधा खूल्या

सातारा : पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत जलतरण तलाव, योगा संस्था, क्रीडा प्रकार, थिएटर, चित्रपटगृहे, मल्टीफ्लेक्स, ड्रामा थिएटर चालू करण्यास परवानगी दिली आहे. याबाबतचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी काढले आहेत.

या आदेशानुसार 30 नाेव्हेंबरपर्यंत सातारा जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविदयालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इंस्ट्युटयुट (कॉम्प्युटर व टायपिंग इन्सिटयुट वगळून) या बंद राहतील. तथापी ऑनलाईन/दुरस्थ शिक्षणास परवानगी राहील. ऑनलाईन शिक्षण /दुरध्वनी आणि संबंधित कार्यासाठी शाळेत 50 टक्के शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परवानगी राहील, त्यासाठी शिक्षण विभागाने, आरोग्य व सुरक्षततेबाबत निर्धारित केले आदर्श कार्य प्रणाली (STANDARD OPERATING PROCEDURE - SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील. राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, औदयोगिक प्रशिक्षण उपक्रम (आयटीआय), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ किंवा राज्य कौशल्य विकास मंडळ किंवा भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारच्या इतर मंत्रालयामध्ये, नोंदणीकृत अल्पकालीन प्रशिक्षण केंद्रांमध्ये कौशल्य किंवा उद्योजकता प्रशिक्षण घेणेस परवानगी राहील. राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था (NIESBUD), भारतीय उदयोजक संस्था आणि त्यांचे प्रशिक्षण प्रदाते यांना देखील परवानगी राहील. त्यासाठी आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.  उच्च शिक्षण संस्थामध्ये ऑनलाईन/दुरस्थ शिक्षण हे प्राधान्यप्राप्त अध्यापनाचे साधन असेल आणि त्यास प्रोत्साहित केले जाईल. तथापी, केवळ उच्च शिक्षण संस्था (पी.एच.डी.) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रवाहातील पदव्युत्तर विदयार्थ्यांसाठी प्रयोगशाळेतील/प्रयोगात्मक कामांसाठी परवानगी राहील.

केंद्रीय वित्तपुरवठा उच्च शिक्षणासाठी संस्था, संस्था प्रमुख यांची स्वत:ची खात्री झाल्या नंतरच प्रयोगशाळा / प्रयोगात्मक कामांसाठी विदयार्थांना बोलवणेस परवानगी राहील,  इतर सर्व उच्च शैक्षणिक संस्था उदा. राज्य विद्यापीठे, खासगी विद्यापीठे, इ. ते केवळ संशोधन अभ्यास (पी.एच.डी. आणि विज्ञान आणि तंत्राज्ञानातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळेतील / प्रायोगिक कामांसाठी परवानगी राहील. 

सर्व सरकारी आणि खाजगी ग्रंथालयांना सामाजिक  अंतर व स्वच्छतेचे पालन करून काम करणेची परवानगी राहील. रेल्वे व विमान प्रवासी वाहतूक काही ठराविका आदेशाने गान्यता दिली असेल किंवा SOP नुसार चालू राहील, सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रम तसेच मोठया संखेने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद राहतील. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखु  इत्यादी सेवन करणेस मनाई करणेत या आहे. सर्व धार्मीक स्थळे व प्रार्थना स्थळे सर्वसामान्यांसाठी बंद राहतील. तथापि, रोथील नित्य नियमाचे धार्मिक कार्यक्रम संबंधित धर्मगुरु, पुजारी यांना करता येतील. 

शासनाची परवानगी; पण जलतरण तलाव कोरडेच
 
सातारा जिल्हा कार्यक्षेत्रातील हॉटेल / फुड कोर्टस्, रेस्टॉरंट आणि बारस् यांना 50 टक्के पेक्षा जास्त नाही, इतक्या क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी देत आहे. तथापि, पर्यटन विभागाने निर्धारित केलेली आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील. ऑक्सिजनची वाहतूक करणान्या वाहनांना कोणत्याही वेळी राज्यांतर्गत तसेच राज्याबाहेर मुक्त हालचाल करण्यास परवानगी आहे. राज्य व केंद्र शासनाने कोव्हिड- 19 बाबत ठरविलेल्या राजशिष्टाचारानुसार सर्व रेल्वे यांना राज्यात सुरवात ते शेवट पर्यत प्रवासास मुभा राहील. सर्व मार्केट, दुकाने सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत चालु रहातील. तथापि, मेडीकल औषधाची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवण्यास परवानगी राहील. जर पाच पेक्षा जास्त व्यक्ती दुकानात असल्यास अथवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास तात्काळ बंद करावीत. 

माणदेशात 50 हून अधिक पक्ष्यांच्या नव्याने नोंदी

सातारा जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई आहे. तथापि, प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृहे, घर, घराच्या परिसरात 50 लोकांच्या कार्यक्रमासाठी मर्यादीत लग्नाशी संबंधित मेळावे, समारंभ आयोजन करण्यास संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकार राहील. अंत्यविधी यासारख्या कार्यक्रमास 20 पर्यंत (संपुर्ण कार्यक्रमासाठी) व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम करणेस परवानगी राहील. वृत्तपत्र छपाई आणि वाटप करणेस परवानगी देणेत येत आहे. (घरपोच वितरणासह). बाग, उदयाने आणि करमणुकीच्या उददेशाने सार्वजनिक मोकळया जागा चालु राहतील.

कन्टेनमेंट झोन बाहेर, व्यवसायाच्या अनुषंगाने प्रदर्शनास परवानगी राहील. त्यासाठी औद्योगिक विभागाने निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील. कन्टेनमेंट झोन बाहेरील क्षेत्रात स्थनिक साप्ताहीक बाजार (जनावरांसह) उघडणेस परवानगी राहील. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था यांनी निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.) रेल्वेने रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी व मुद्रांकन करणेची आवश्यक्ता नाही. तथापी कोविड- 19 च्या अनुषंगाने या प्रवाश्यांनी सामाजीक आंतर व स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक आहे. 

खड्ड्यांत अनेकांचा जीव जातोय, तरीही लोकप्रतिनिधी गप्पच; रस्त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर

केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर हे शासनाने दिलेल्या अटी व शर्ती तसेच जिल्हाधिकारी यांच्या अटी व शर्तीन्वये चालू ठेवणेस परवानगी देणेत येत आहे. सातारा जिल्हयातील सर्व सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र व आधारकेंद्र जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चालू ठेवणेस परवानगी राहील. इंनडोअर हॉलमधील खेळाच्या सुविधा चालू करणेबाबत परवानगी राहील. सातारा जिल्ह्यातील व्यायामशाळा चालू ठेवणेस परवानगी राहील.

सातारा जिल्हयातील इंधन पंप, औदयोगिक आस्थापना व सर्व वैद्यकीय आस्थापना पुर्णवेळ चालू ठेवणेस  राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडापटुंच्या प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या जलतरण तलावांना परवानगी देण्यात येत आहे. यासाठी क्रिडा व युवा व्यवहार विभागाकडून निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणारनी (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.  कन्टेनमेंट झोन बाहेरील क्षेत्रात योग संस्था चालु करणेस परवानगी राहील. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग यांनी निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.

बॅडमिंटन, टेनिस स्क्वॅश, इनडोअर शुटिंग रेंज इ. मधील सर्व खेळांमध्ये शारीरीक व स्वच्छताविषयक पालन करुन चालु करणेस परवानगी राहील. कन्टेनमेंट झोन बाहेरील क्षेत्रात सिनेमा हॉल/थिएटर/ मल्टिप्लेक्स/ नाटक थिएटर हे बसण्याच्या 50% क्षमतेने चालू राहील. यामध्ये कोणत्याही खाण्यायोग्य वस्तुंना परवानगी दिली जाणार नाही. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग माहिती व प्रसारण मंत्रालय यांनी निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.

मराठा समाजातील संघटनांत इगाे प्राॅब्लेम : उदयनराजे

सातारा जिल्हयातील पर्यटन स्थळे खुली करण्यात आले आहे. सार्वजनीक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे तेथे असताना चेह-याचे तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणा-या व्यक्तीवर पाचशे रुपये दंड आकारावा, सातारा जिल्हयातील कोणत्याही सार्वजनिक अथवा ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त प्रमाणात आहे अशा खाजगी जागेच्या ठिकाणी धुंकणेस मनाई असून, थुकल्यास  एक हजार रुपये दंड आकारावा. दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये किमान सहा फुट अंतर तसेच दुकानामध्ये एकावेळी पाच पेक्षा जास्त व्यक्तींना घेणेस मनाई करणेत येत आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास ग्रामीण भागासाठी  दाेन हजार रुपये व शहरी भागासाठी तीन हजार रुपये दंड आकारावा. तसेच सात दिवसापर्यंत दुकान सक्तीने बंद करावे. सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी. जिल्हयात सार्वजनिक ठिकाणी, लोकांचा वावर असणाऱ्या खाजगी ठिकाणी तसेच वाहतुकीच्या साधनामध्ये सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. कामाच्या ठिकाणी खालील अतिरिक्त निर्देशांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व सामान्य माणसाच्या वापरात येणाऱ्या सर्व जागा व वस्तू यांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करणेत यावे. औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना यांनी त्यांचे कामगारामध्ये, कामाची पाळी बदलणेचे वेळी, जेवणाचे व इतर सट्टी वेळी, कामावर येतानाध कामावरुन सुटताना सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com