
Karad Shocked by ‘Tapka’ Case; Questions Arise Over Police Inaction
Sakal
-सचिन शिंदे
कऱ्हाड : बाप तो बाप रहेगा, टपका रे टपका, एक और टपका... यासारख्या गाण्यांवर नाचणाऱ्यांनी नवरात्रोत्सवातील दुर्गादेवीच्या विसर्जन मिरवणुकांत तीन दिवसांपासून कऱ्हाडकरांना वेठीस धरले. सहा ते दहा थरांच्या सहन न होणाऱ्या आवाजाच्या ध्वनिक्षेपकांचा दणदणाटाने शहर तीन दिवसांपासून हादरत राहिले. तरीही पोलिसांकडून कारवाई होताना दिसली नाही. मंडळांनी आवाजाच्या मर्यादा १०० डेसिबलहून अधिकवर नेली. हा धोकादायक टप्पा आोलंडूनही पोलिस गप्प का? अशी चर्चा आता शहरात होत आहे.