esakal | सरपंचपदाच्या निवडीत सेनेचे प्रयत्न निष्फळ; भाजप- राष्ट्रवादीनेच मारली बाजी
sakal

बोलून बातमी शोधा

Tarale Sarpanch Election

या निवडींसाठी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून बापूराव खरात, ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण थोरात यांनी काम पाहिले. निवडीच्या सभेस प्रणिल यादव, सागर माळी, किरण सोनावले, तोफिक डंगरे, रुक्‍मिणी जंगम, रोहिणी जाधव, पूजा काटकर, अपर्णा जाधव, रामचंद्र देशमुख, संगीता जाधव, पूजा सरगडे, दीपाली पवार, पूनम जरग आदी सदस्य उपस्थित होते.

सरपंचपदाच्या निवडीत सेनेचे प्रयत्न निष्फळ; भाजप- राष्ट्रवादीनेच मारली बाजी

sakal_logo
By
यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (जि. सातारा) : येथील सरपंचपदासाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत सरपंचपदाची सूत्रे भाजप- राष्ट्रवादीच्या आघाडीकडे राहिली. आघाडीच्या प्रकाश जाधव यांची सरपंचपदी निवड झाली. सुधा पवेकर यांची उपसरपंचपदी निवड झाली. दोघांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या देसाई गटाच्या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी सात मते मिळाली. निवडीनंतर आघाडीच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. 

येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजपच्या आघाडीने देसाई गटाला धूळ चारत सत्तांतर घडवले. येथे 17 पैकी 10 जागा मिळवून आघाडीने देसाई गटाची सत्ता हिसकावून घेतली. सरपंच व उपसरपंच पदासाठी आघाडीकडून प्रकाश जाधव व सुधा पवेकर यांनी अर्ज भरले हाेते. त्यासोबत शिवसेनेकडून गौरव परदेशी व शंकर साळुंखे यांनीही अर्ज दाखल केले. चारही अर्ज वैध झाले. अर्ज माघारीसाठी पुरेसा वेळ देऊनही अर्ज कायम राहिल्याने मतदान घेण्यात आले.

मतदानात आघाडीच्या प्रकाश जाधव व सुधा पवेकर यांना प्रत्येकी दहा, तर देसाई गटाच्या गौरव परदेशी व शंकर साळुंखे यांना प्रत्येकी सात मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी जयवंत वाघ यांनी सरपंचपदी बहुमताने प्रकाश जाधव यांची तर उपसरपंचपदी बहुमताने सुधा पवेकर यांची निवड जाहीर केली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून व फटाक्‍यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा केला. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व कार्यकर्त्यांनी गावातून फेरी काढली. 

सहायक निवडणूक अधिकारी म्हणून बापूराव खरात, ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण थोरात यांनी काम पाहिले. निवडीच्या सभेस प्रणिल यादव, सागर माळी, किरण सोनावले, तोफिक डंगरे, रुक्‍मिणी जंगम, रोहिणी जाधव, पूजा काटकर, अपर्णा जाधव, रामचंद्र देशमुख, संगीता जाधव, पूजा सरगडे, दीपाली पवार, पूनम जरग आदी सदस्य उपस्थित होते.

शेतकर्‍यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका; आमदार गोरेंचा सरकारला दम

व्यायामशाळेसाठी 55 ग्रामपंचायतींना मिळणार 2.80 कोटींचा निधी; युवकांत आवड निर्माण करण्यासाठी उपक्रम

कऱ्हाडातील बुधवारपेठेत एकावर कोयत्याने सपासप वार; थरारक हल्ल्यात एकजण जखमी

आयबीपीएस आरआरबी क्‍लार्क मुख्य परीक्षेचा ऍडमिट कार्ड वेबसाइटवर उपलब्ध ! असे करा डाउनलोड

बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top