

Karad Crime
Sakal
कऱ्हाड : विद्यानगरमध्ये एका खासगी क्लासमधील शिक्षकाच्या सांगण्यावरून अल्पवयीन मुलाने तब्बल सोळा तोळे सोन्याचे दागिने चोरले. चोरलेले दागिने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी संबंधित शिक्षकाकडेच ठेवायला दिले. याप्रकरणी शहर पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्यानंतर सर्व प्रकार उघड झाला.