शिक्षकांच्या बदल्यांची आठ दिवसांत प्रक्रिया

ऑनलाइन ॲपवर सोमवारपर्यंत माहिती भरण्याची मुदत; एका समितीची स्थापना
Satara ZP
Satara ZPSakal

सातारा - येत्या आठ दिवसांत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची ऑनलाइन प्रक्रिया सुरू होणार आहे. या प्रक्रियेत बदलीसाठी पात्र असणाऱ्या शिक्षकांना २७ जूनपर्यंत ऑनलाइन ॲपवर माहिती भरण्याची मुदत दिली आहे.

कोरोना काळात शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया न झाल्याने बदलीपात्र शिक्षकांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी एका अ‍ॅपची निर्मिती केली आहे. याबाबत एक समिती तयार केली असून, या समितीचे सदस्य म्हणून जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा काम पाहत आहेत. शिक्षकांच्या बदल्यांमध्ये कुठेही तक्रार राहू नये, यासाठी या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे आणि एका शाळेत पाच वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत.

बदलीपात्र शिक्षकांना ५० शाळांचा पसंतीक्रम देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सुगम आणि दुर्गम शाळांची यादी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घोषित केली आहे. प्रत्येक शिक्षकाला ऑनलाइन माहिती भरण्याचे आदेश शासनाकडून असून, शिक्षकांची प्रोफाईल तयार करण्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. ही माहिती शासनाच्या पोर्टलवर भरण्यात येणार असल्याने कोणता शिक्षक कोणत्या शाळेत किती वर्षे आहे, याची संपूर्ण माहिती शासनाकडे राहणार आहे.

या बदली प्रक्रियेत जिल्ह्यात एकूण सात हजार १७३ प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी किती शिक्षकांच्या बदल्या होणार, याची उत्सुकता लागली आहे. आपसी, विनंती आणि प्रशासकीय बदल्या पहिल्यांदाच अ‍ॅपद्वारे होत आहेत. जन्मदिनांक, नावे, नेमणूक दिनांक बदल आदी १२३ तांत्रिक हरकती शिक्षण विभागाकडे आल्या होत्या. या हरकतींचा निपटारा करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाकडून सुरू आहे.

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी ॲपची निर्मिती केली असून, त्यामध्ये माहिती अपलोड केल्यानंतर तपासणी होणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेत गैरप्रकारास कुठलीही संधी नसून सगळ्या बदल्या नियमानुसार होणार आहेत.

- विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com