Teachers Bank Election Result : शिक्षक बँकेत 'परिवर्तन'ची आघाडी; पाहा संपूर्ण निकाल एका क्लिकवर.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teachers Bank Election 2022

शिक्षक बॅंकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.

Teachers Bank Election Result : शिक्षक बँकेत 'परिवर्तन'ची आघाडी; पाहा संपूर्ण निकाल एका क्लिकवर..

सातारा : शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या शिक्षकबॅंकेसाठी चुरशीनं मतदान झालं. यामध्ये सर्वाधिक वाई आणि परळी मतदान केंद्रांवर सर्वाधिक ९० टक्क्याहून अधिक मतदान झालं. तर, एकूण ८१ टक्के मतदान झालं होतं. आज याचे निकाल हाती येत आहेत.

शिक्षक बॅंकेची निवडणूक (Teachers Bank Election 2022) जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. आज जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्टच्या हॉलमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये नागठाणे, परळी, महाबळेश्वर (Mahabaleshwar) इथं सभासद परिवर्तन पॅनेलचे उमेदवार आघाडीवर असून जावळीत शिक्षक समितीला धक्का बसला आहे. सध्या नागठाणेत सभासद परिवर्तन पॅनेलचे विशाल कणसे विजयी झाले असून त्यांना 391 मतं मिळाली आहेत. तर त्यांचा प्रतिस्पर्धी तुषार घाडगे 233 मतं मिळाली आहेत.

हेही वाचा: Patan : माझा डोंगुर कुठं गेलाय, मलाच काय कळंना झालंय; शहाजीबापूंच्या डायलॉगबाजीवर टाळ्या अन् शिट्या

याशिवाय, खंडाळ्यात (Khandala) समितीचे उमेदवार विजय ढमाळ विजयी झाले असून त्यांना 307 मतं तर त्यांचे प्रतिस्पर्धी दशरथ ननावरे यांना 138 मतं मिळाली आहेत. तर जावळीत पुस्तके यांच्या संघाचा उमेदवार अवघ्या 4 मतांनी विजयी झाला आहे. निवडणुकीत विजय शिर्के यांना 326 तर शामराव जनुगडे यांना 322 मतं मिळाली आहेत. आरळेमध्ये नितीन राजे 293, मनोहर माने 265, गणेश दुबळे 23 यांना मत मिळाली. यात परिवर्तन पॅनेलच उमेदवार नितीन राजे 28 मतांनी विजयी झाले आहेत. तसेच फलटणमध्ये शशिकांत सोनवलकर 272, लक्ष्मण शिंदे 210, राजेश बोराटे 156, विजय भोसले 30 यांना मतं मिळाली. यात समितीचे उमेदवार सोनवलकर विजयी झाले आहेत.

असं झालं होतं मतदान

कऱ्हाड ८५.७१, कऱ्हाड ८०.२५, पाटण ९१.२८,  नागठाणे ८३.१०,  सातारा ७४.०८, परळी ९०.१२,  मेढा ८४.७०, महाबळेश्वर ८७.३७, वाई ९०.४८, भुईंज ८२.४६, खंडाळा ८१.२३, फलटण ७३.६१, फलटण ७७.११, कोरेगाव ७७.९५, रहिमतपूर ८३.८४, खटाव ८८.१३, मायणी ७५.५०, दहिवडी ८३.०२, म्हसवड ७२.७१ असे ८१.५८ टक्के मतदान झाले.