
सातारा : शिक्षक बदली प्रक्रियेत दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोन शिक्षकांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. यामधील एका शिक्षिकेवर दिव्यांग प्रमाणपत्रात गैरप्रकार केल्याच्या आरोपावरून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात एक व आज दोन शिक्षक अशा एकूण तीन शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.