
सातारा : शिक्षक बदली प्रक्रियेत प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्यांमधून सूट मिळण्यासाठी प्राथमिक शिक्षकांकडून गैरमार्गांचा अवलंब होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अनेक शिक्षकांनी दिव्यांग, गंभीर आजारग्रस्त असल्याचे दाखवून प्रशासनाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर ज्या शिक्षकांनी घटस्फोटीत व इतर आजार दाखवून गैरप्रकार केला आहे, त्यांची सेवापुस्तकावर नोंद घेण्यात येणार आहे. बदली प्रक्रियेत निकषाची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय झेडपी प्रशासनाने घेतल्याने प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.