
Farmers struggle to upload documents on Mahadibeti portal due to technical glitches, delaying their benefits.
esakal
सातारा: शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी महाडीबीटी पोर्टलची (संकेतस्थळ) निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या पोर्टलवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या विशिष्ट घटकासाठी निवडीनंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करता आलेली नाहीत, तसेच अवजारांची नावे व पोर्टलवर समाविष्ट नावे जुळत नाहीत. त्यामुळे अनेकदा प्रकरणे रिजेक्ट होत आहेत. त्यामुळे पात्र असूनही शेतकऱ्यांना केवळ तांत्रिक अडचणींमुळे योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.