esakal | मेडिकल कॉलेजची टेंडर प्रक्रिया लांबणार; डिसेंबरमध्ये 'निविदा'ची शक्यता I Medical College
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Medical College

वैद्यकीय महाविद्यालयासाठी ‘एमसीआय’ने मान्यता दिल्यानंतर आता पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

मेडिकल कॉलेजची टेंडर प्रक्रिया लांबणार

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (Satara Medical College) मान्यता मिळाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष निविदा प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष बांधकाम कधी सुरू होणार, याकडे लागलेले आहे. पण, सध्या सल्लागार संस्थेच्या नेमणुकीसाठी आठ कंपन्यांनी निविदा भरलेल्या आहेत. त्याचा मुद्दा शासकीय स्तरावर प्रलंबित आहे. त्यानंतर प्रत्यक्ष प्लॅन व आराखडा तयार करण्यास तीन महिने जाणार आहेत. त्यामुळे डिसेंबरमध्येच इमारत बांधकामाची निविदा प्रक्रिया होणार आहे.

साताऱ्यात होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ‘एमसीआय’ने मान्यता दिल्यानंतर आता पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. तर मूळ साठ एकर जागेवर प्रत्यक्ष महाविद्यालयाची इमारत होण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया सध्या सुरू आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामांपर्यंतच्या सर्व प्रक्रिया या सल्लागार संस्थेच्या नेमणुकीनंतर होणार आहेत. या सल्लागार संस्थेसाठी झालेल्या निविदा प्रक्रियेत आठ कंपन्यांनी निविदा भरलेल्या आहेत. यामध्ये स्कायलाईन, आर्किटेक्ट युनायटेड, आर्क एन डिझाईन, दत्ता ॲण्ड दत्ता, इंटीग्रेड, मुकेश असोसिएटस्, शशी प्रभू ॲण्ड असोसिएटस्‌, वास्तूनिधी या आठ संस्थांनी सहभाग नोंदविला. या संस्थांनी सल्लागार म्हणून काम करताना किती मानधनावर काम करणार, हे बंद लिफाफ्यातून दिले आहे. यातून ज्या संस्थेचे काम चांगले आहे, मानधन कमी असेल, अशा संस्थेला सल्लागार म्हणून नेमले जाणार आहे. त्यामुळे या आठ संस्थांतून कोणत्या एका संस्थेचे नाव अंतिम करायचे, हे राज्य सरकार व वैद्यकीय शिक्षण विभाग निश्चित करणार आहे.

हेही वाचा: मुलांसमोर पालकांनी 'या' 5 गोष्टी चुकूनही करू नयेत

सध्यातरी हा विषय शासनस्तरावर प्रलंबित आहे. त्यामुळे सल्लागार संस्थेची नेमणूक झाली की प्रत्यक्ष वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाचा आराखडा व प्लॅन तयार केला जाणार आहे. त्यासाठी तीन महिन्यांची मुदत असेल. त्यानंतर हा प्लॅन सल्लागार संस्थेकडून मान्य झाल्यावर इमारत बांधकामाची निविदा प्रक्रिया होणार आहे. त्यासाठीही अनेक कंपन्या इच्छुक असून, त्यासाठी प्रत्यक्ष निविदा भरल्यावरच त्यांची नावे निष्पन्न होणार आहेत. साधारणपणे डिसेंबरमध्ये बांधकामासाठी निविदा प्रक्रिया होणार आहे. ही संपूर्ण साडेचारशे कोटींची निविदा प्रक्रिया असणार आहे. यामध्ये इमारत बांधकाम, अंतर्गत सुविधा, सुसज्ज लॅब, लेक्चर हॉल, ऑपरेशन थिएटर, मुला-मुलींचे निवासी वसतिगृह, स्टाफच्‍या निवासी इमारतींचा समावेश असेल. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष सल्लागार संस्थेच्या निवडीकडे लागले आहे. त्यानंतरच वैद्यकीय महाविद्यालयाचा आराखडा व प्लॅन कागदावर उमटणार आहे.

हेही वाचा: जरंडेश्वर कारखान्याकडून सरकारची मालमत्ता हडप; भाजपचा गंभीर आरोप

आठ संस्थांच्या निविदा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सल्लागार संस्थेसाठी निघालेल्या निविदेमध्ये स्कायलाईन, आर्किटेक्ट युनायटेड, आर्क एन डिझाईन, दत्ता ॲण्ड दत्ता, इंटीग्रेड, मुकेश असोसिएटस्, शशी प्रभू ॲण्ड असोसिएटस्‌, वास्तूनिधी या आठ संस्थांनी सहभाग नोंदविला. या संस्थांनी सल्लागार म्हणून काम करताना किती मानधनावर काम करणार, हे बंद लिफाफ्यातून दिले आहे. त्यातील कोणाचे नाव वैद्यकीय शिक्षण विभाग निश्चित करणार, हे महत्त्‍वाचे आहे.

loading image
go to top