

Chaos During Patan Celebration Rally; Ministers Gole, Naik Targeted by Workers
Sakal
मोरगिरी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पाटण तालुक्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी निर्विवाद यश मिळवले. त्यानिमित्त दाैलतनगर येथे विजयी रॅली व सभा झाली. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपकडून ग्रामविकासमंत्री जयकुमार गाेरे व वनमंत्री गणेश नाईक यांनी पालकमंत्र्यांवर टीका केली हाेती. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयी रॅलीत एका पाेस्टरवर ‘टांगा पलटी, घाेडे फरार’ असा मजकूर व त्याला साजेसे कार्टून काढून तेथे दाेन्ही भाजप मंत्र्यांचे छायाचित्रे लावून डिवचल्याचे दिसून आले.