esakal | सब जेल, लॉकअपसाठी जागा द्या; शेतकरी संघटनेची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

सब जेल, लॉकअपसाठी जागा द्या; शेतकरी संघटनेची मागणी

तातडीने त्या खोल्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शेतकरी संघटनेने प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदनाद्वारे केली.

सब जेल, लॉकअपसाठी जागा द्या; शेतकरी संघटनेची मागणी

sakal_logo
By
- हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा): नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये सबजेल, लॉकअप, शस्त्रागारासाठी सात खोल्या, तसेच महिला आरोपीसाठी दोन गार्ड रूम देणे आवश्यक होते. मात्र ते दिलेले नाही. त्यामुळे पोलिस विभागातील आरोपी लॉकअप नसल्याने आरोपींना ठेवणे, त्यांची देखरेख, सुरक्षा करणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे तातडीने त्या खोल्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शेतकरी संघटनेने प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदनाद्वारे केली.

हेही वाचा: पाटणला रिक्त पदांमुळे रखडल्या मोजण्या; हजारांवर प्रकरणे प्रलंबित

शेतकरी संघटनेचे नेते अनिल घराळ, विवेक कुराडे, शेतकरी संघटना क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेड जिल्हाध्यक्ष विजय पाटील, तालुका उपाध्यक्ष लालासाहेब पाटील, स्वाती पिसाळ, प्रसाद पाटील, अक्षय गवळी, सागर बर्गे, शशीराज करपे, मानसिंग पाटील, अंकुश निकम, चंद्रशेखर पाटील, संजय थोरात, रंजना पाटील, पांडुरंग पाटील, फय्याज इनामदार, जिकर बागवान, तात्यासाहेब साळुंखे, दिलीप पवार, रोहित पवार, सुमन कोळी, संदीप साळुंखे, मोहन कदम, मोहन लाकुले, शिवाजी वाघमोडे, संदीप काळे आदींच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले.

हेही वाचा: ...अखेर ढेबेवाडीकरांची दूषित पाण्यापासून सुटका

निवेदनातील माहिती अशी:

नवीन प्रशासकीय इमारत बांधताना शहर पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या सात खोल्या या शहर पोलिस ठाण्याच्या वापरासाठी परत देणे आवश्यक होते. त्यामध्ये महिला आरोपी व पुरुष आरोपीची चौकशी, रिमांड, पीसीकरिता जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे महिला व पुरुष आरोपी ठेवण्यासाठी गैरसोय होत आहे. त्यासाठी तातडीने ती जागा उपलब्ध करावी, अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनाच्या प्रती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना देण्यात आल्या आहेत.

loading image
go to top