
दुधेबावी : फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्यावेळी संशयितरीत्या फिरताना आढळून आलेल्या पाच जणांकडे पोलिसी खाक्याने चौकशी केली असता त्यांनी काही ट्रान्सफॉर्मरची चोरी केली असल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडीही सुनावण्यात आली आहे.