esakal | नगराध्यक्षांनी पत्र देवूनही प्रशासनाकडून सभा घेण्यास होतेय टाळाटाळ
sakal

बोलून बातमी शोधा

Karad Municipality

इतिवृत्त लिखाण अपूर्ण असल्याचे कारण सांगून प्रशासकीय पातळीवर सभा घेण्यास टाळाटाळ होते आहे.

नगराध्यक्षांनी पत्र देवूनही प्रशासनाकडून सभा घेण्यास होतेय टाळाटाळ

sakal_logo
By
सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा): पालिकेच्या मासिक सर्वसाधारण सभेसह स्थायी समितीच्या सभा घेण्याबाबत नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी पालिकेच्या प्रशासकीय विभागाला पत्रे दिली आहेत. इतिवृत्त लिखाण अपूर्ण असल्याचे कारण सांगून प्रशासकीय पातळीवर सभा घेण्यास टाळाटाळ होते आहे. त्याबाबतही नगराध्यक्षा शिंदे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. त्यामुळे सभा न होण्यामागे प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सर्वजण कारणीभूत आहेत, त्यांच्या दिरंगाईने सातवेळा मुख्याधिकारी, सभा अधिक्षकांना सुचीत करूनही त्यांनी सभा घेतलेल्या नाहीत, असे नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: सातारा शहराचे होणार गुगल मॅपिंग! नगरपालिकेची तयारी

पालिकेची वर्षात एकच मासिक सर्वसाधारण सभा तर सहा महिन्यापूर्वी स्थायी समितीची सभा झाली आहे. त्या दोन्ही सभा व्हाव्यात, यासाठी लोकशाही व जनशक्ती आघाडी आक्रमक झाली. नगराध्यक्षा शिंदे, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडे लेखी पत्र देवून त्यांनी मागणी केली आहे. त्याची दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बैठक घ्यावी, अशी मागणी करणार असल्याचा इशारा दोन्ही आघाड्यांनी दिला आहे. त्यासोबतच नगराध्यक्षा शिंदे यांही बैठक न होण्यास जबाबदार आहेत, असाही आरोप केला आहे.

हेही वाचा: सातारा: जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या आवारात बिबट्या

ठरावावर स्वाक्षऱ्यासह मागील इतिवृत्ताचे काम अपूर्ण असल्याने सभा घेत नसल्याचे लोकशाहीचे अध्यक्ष सौरभ पाटील व जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव यांचे म्हणणे आहे. नगराध्यक्षा शिंदे यांनी जानेवारीपूर्वीपासून सभा घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पत्र व्यवहार केला आहे. मुख्याधिकारी रमाकांत डाके व सभा अध्यक्षांनाही त्यांनी सात वेळा पत्र लिहून सभा घ्याव्यात, अशा सूचना नगराध्यक्षा सौ. शिंदे यांनी केल्या आहेत. प्रत्येकवेळी त्यांनी इतिवृत्ताचे काम अपूर्ण असल्याचे कारण सांगून सभा घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. वास्तविक सभा व्हावी, यासाठी पहिल्यापासून पाठपुरावा करत आहे. मात्र प्रशासकीय पातळीवर होणाऱ्या दिरंगाईने सभा होत नाही, असे नगराध्यक्षा सौ. शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: सातारा : भुतेघर, वाहिटे, बोंडारवाडीची भूगर्भ शास्त्रज्ञांकडून पाहणी

पालिकेची मासिक सर्वसाधारण व स्थायी समितीच्या बैठका घेण्यासह बैठकांचे प्रोसिडिंग पूर्ण करण्याच्या सूचना मुख्याधिकारी, सभा अधीक्षकांना दिल्या आहेत. मात्र ते पूर्ण करण्यास प्रशासनाकडून विलंब होतो आहे. त्याची माहिती सर्वांना होणे गरजेचे आहे. शहरातील नागरिकांनी चार, पाच बैठकीत काय घडले आहे. काही घेतलेल्या बैठकाही कुणामुळे व ऐनवेळेला रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे बैठका रद्द होण्यासाठी फक्त मी जबाबदार नाही. अन्य सर्वजण त्याला तितकेच जबाबदार आहेत.

- रोहिणी शिंदे,नगराध्यक्षा, कऱ्हाड

loading image
go to top