esakal | हातगेघर धरणग्रस्तांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीस गती
sakal

बोलून बातमी शोधा

हातगेघर धरणग्रस्तांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीस गती

संबंधितांना कृष्णा खोरे विभाग सर्व नागरी सुविधा पुरविण्यासाठी कटीबद्द असल्याचे उपअभियंता श्री.पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.

हातगेघर धरणग्रस्तांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीस गती

sakal_logo
By
महेश बारटक्के

कुडाळ (सातारा): धरणग्रस्तांच्या गावठाणातील हाय टेन्शनच्या लाईनचे व गांडूळखत प्रकल्पाचे अतिक्रमण काढून टाकणे, गावठाणाचे सपाटीकरण, विद्युत तारा दुरूस्ती, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरूस्ती, आदी विषयांसंदर्भात पाहणी करून येत्या महिनाभरात कार्यवाही करण्याचा निर्णय झाला असून त्यानुसार लवकरात लवकरात गावठाणात प्लॉट मिळालेल्या धरणग्रस्तांनी घरे बांधून राहायला सुरवात करावी. संबंधितांना कृष्णा खोरे विभाग सर्व नागरी सुविधा पुरविण्यासाठी कटीबद्द असल्याचे उपअभियंता श्री.पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.

हेही वाचा: कुडाळ - आमदार वैभव नाईक यांच्यासह 40 जणांवर गुन्हा दाखल

हातगेघर ता. जावळी येथील धरणग्रस्तांच्या विविध प्रश्नांची सोडवून करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी सातारा यांचे कार्यालयात जनजागर प्रतिष्ठानचे प्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त तसेच संबंधित विविध खात्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत नुकतीच बैठक झाली होती. त्यानुसार बैठकीत झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी हातगेघर (कोळकी) ता. फलटण येथील पुनर्वसित गावठाणातील विविध समस्या जाणून घेण्यासाठी कृष्णा खोरे पाटबंधारे प्रकल्पाचे उपअभियंता श्री पाटील, जनजागर प्रतिष्ठानचे राज्य समन्वयक देवराज देशमुख यांचा संयुक्त पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता.

हेही वाचा: प्रवाशांमध्ये खळबळ: कुडाळ रेल्वे स्थानकावर दोघे पॉझिटीव्ह

यावेळी वाढीव गावठाणाची जागा, प्लॉटमधील अनाधिकृतपणे झालेले उत्खनन, रस्ते, विद्युत लाईन, शाळा इमारत, सार्वजनिक शौचालय यांची पाहणी करण्यात आली. यावेळी श्रीहरी गोळे यांच्यासह धरणग्रस्तांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडल्या. गावठाणातील वाढलेली काटेरी झुडपे काढून, सपाटीकर करणे. ज्या प्लॉटच्या हद्दी व्यवस्थित नाहीत, त्यांची फेर मोजणी करून प्लॉटचे रेखांकन करून द्यायचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सहाय्यक अभियंता औताडे, जनजागर प्रतिष्ठानचे सातारा जिल्हा सहसमन्वयक श्रीहरी गोळे, हातगेघर प्रकल्पग्रस्तांचे शिष्ठमंडळ, सर्जेराव गोळे, अध्यक्ष मारुती गोळे, अशोक गोळे, राजेंद्र गोळे, ग्रामपंचायत सदस्य संदीप गोळे, ज्ञानेश्वर गोळे, राहुल गोळे आदी उपस्थित होते.

loading image
go to top