esakal | Satara : वारूंजी फाट्यावर रस्त्याकडेला पडलेले धान्य महिलांनी केले पसार
sakal

बोलून बातमी शोधा

satara

वारूंजी फाट्यावर रस्त्याकडेला पडलेले धान्य महिलांनी केले पसार

sakal_logo
By
(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हा़ड : कोणतरी अनोळखी? व्यक्तींनी २० ते २५ गहू, ज्वारी या धान्याची पोती फेकून दिली होती. त्या पोत्यातील धान्य नेण्यासाठी महिलांची झुबड उडाली होती. पोती कोणी फेकली याटे गुपीत मात्र कायम राहिले होते. येथील वारूजी फाट्यावर पुणे- बंगळुरू महामार्गावर दुपारी ही घटना घडली.

सेवा रस्त्याच्या कडेला फेकलेले धान्य पळवल्याची घटनेने खळबळ उडाली. वारुंजी फाटा रस्त्याकडेला फेकलेले होते. त्यात २० ते २५ पोती धान्य होते. ते नेमको कोणी व का फेकले होते. याची माहिती मिळू शकली नाही.शनिवारी रात्रीपासून ती पोत  पडल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर काहींनी जवळ जावून पाहिले. त्यात गहू, ज्वारी असे धान्य होते. ते चांगल्या प्रतीचेही होते.

त्यानंतर बघता बघता तेथे ते धान्य पळविण्यासाठी महिलांची गर्दी जमली. सुमारे २५ ते ३० किलोची रस्त्याकडेला पडलेल्या. पोत्यातील धान्य पिशव्या व इतर साहित्यात भरून नेण्यास सुरुवात झाली. काही वेळातच तिथे महिला जमल्या. त्यांंनी रस्त्याकडेला पोत्यात पडलेले धान्य भरून नेले.. धान्याविषयी तर्कवितर्कांची चर्चा होती. तसेच धान्य नेण्यास गर्दीही होती. परिसरात चर्चा सुरू आहे.

loading image
go to top