सातारा : कऱ्हाडात साडेबारा लाखांची चोरी

बंद घरातून हिऱ्यांसह सोने-चांदीचे दागिने लंपास; ५० हजारांची रक्कम लांबवली
Theft
TheftSakal

कऱ्हाड - येथील बनपुरीकर कॉलनीतील बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे १२ लाख ५० हजारांचा ऐवज लंपास केला. घरातील कपाट फोडून त्यातील हिऱ्यांसह सोन्या-चांदीचे दागिने व अंदाजे ५० हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. काल (ता. १४) रात्री उशिरा ही घटना घडली. वृषाली पाटील यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. पाटील कुटुंबिय परगावी गेले असताना ही चोरी झाली.

घटनास्थळी पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत या घरफोडीचा पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू होती. पोलिसांनी सांगितले की, वृषाली पाटील या सुटीमुळे फिरण्यासाठी बाहेरगावी गेल्या होत्या. लग्नसराईमुळे हिऱ्यांसह सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम घरी कपाटात ठेवली होती. त्यासह जाताना त्यांनी आपल्याजवळील सुमारे २० तोळ्यांचे सोन्या-चांदीचे दागिने, साधारणतः दोन लाख रुपयांचे डायमंड व अंदाजे ५० हजार रुपयांची रोख रक्कम बेडरूममधील कपाटात ठेवली. फिरण्यास जात असताना त्यांनी कामगार मावशीला घरी लक्ष ठेवण्यास सांगितले होते. त्यानुसार कामगार मावशी काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बंगल्यावर येऊन बंगल्यातील लाइट लावून पुन्हा दरवाजा व गेटला कुलूप लावून निघून गेल्या.

दरम्यान, आज सकाळी कामगार मावशींना बंगल्यावर आल्यानंतर मुख्य गेटचे कुलूप तुटलेले व दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी त्वरित वृषाली पाटील यांच्याशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. वृषाली पाटील यांनी कऱ्हाडकडे धाव घेतली. कऱ्हाडमध्ये पोचल्यानंतर त्यांनी बंगला फोडला असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पोलिसांना घरातील कपाट व कपाटातील लॉकर उघडे असल्याचे दिसले. बेडवर कपडे विस्कटल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी घरफोडीची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानुसार पोलिस अधीक्षकांनी आज सायंकाळच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासाच्या अनुषंगाने पोलिसांना सूचना केल्या. सायंकाळच्या सुमारास ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत घरफोडीच्या घटनेचा पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू होती. वृषाली पाटील यांच्या मुलीचा लॅपटॉप हॉलमध्ये सोप्यावर ठेवलेला तसाच होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com