esakal | मलकापुरात होणार नवा उड्डाण पूल; खासदार पाटलांच्या पाठपुराव्याला मोठं यश

बोलून बातमी शोधा

Shrinivas Patil

मलकापुरात होणार नवा उड्डाण पूल; खासदार पाटलांच्या पाठपुराव्याला मोठं यश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रांच्या सुधारणा, दुरुस्तीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी 558 कोटी 24 लाखांचा निधी मंजूर केला आहे. 558 कोटींपैकी 459 कोटी 52 लाखांचा निधी मलकापूर येथील नव्या उड्डाण पुलासाठी मंजूर झाला आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे निधी मंजूर झाला आहे.

कागल ते शेंद्रे महामार्गाच्या पट्ट्यातील पाच धोकादायक ब्लॅक स्पॉटच्या दुरुस्ती व सुधारणांसाठी 646 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यात चार ठिकाणे सातारा जिल्ह्यातील आहेत. मलकापूर येथील नव्या उड्डाणपुलासाठी 459 कोटी 52 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. मसूर फाटा येथे 47 कोटी 18 लाख, इंदोली फाटा येथे 45 कोटी 35 लाख रुपये अंडर पास पुलासाठी मंजूर आहेत. काशीळ फाटा येथे महामार्गाच्या दोन्ही बाजूस दीड किलोमीटरच्या सेवा रस्त्यासाठी सहा कोटी 19 लाखांची तरतूद आहे. या सगळ्या कामांची अंमलबजावणी सातारा ते कागल महामार्गाच्या सहापदरीकरणच्या कामाबरोबर केली जाणार आहे. खासदार पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे यश आले आहे. त्यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यांना प्रत्यक्ष भेटून जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मागण्या त्यांनी केल्या.

गुड न्यूज! 'कराड जनता'च्या ठेवीदारांचे 329 कोटी जमा; 39 हजार ठेवीदारांना होणार 'लाभ'

सातारा ते कागल अशा 132 किलोमीटरच्या मार्गाची झालेली दुर्दशा, तेथे वाहतुकीला निर्माण होणारी अडचण त्यांनी सांगितली. त्यासह पट्यृातील अपघातांची माहिती देत त्याकडे मंत्री गडकरी यांचे लक्ष वेधले. खासदार पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन मंत्री गडकरी यांनी 22 सप्टेंबर 2020 रोजी खासदार पाटील यांना पत्र लिहिले. त्यात दुरुस्ती व सुधारणांची काम हाती घेत असल्याचे कळविले होते. त्यानंतर लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्‍नोत्तराच्या काळात खासदार पाटील यांनी मुद्दा लावून धरला. खासदार पाटील यांनी केलेल्या मागण्या व सूचनांना मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

प्रवास होणार सुखकर! खासदार उदयनराजेंच्या प्रस्तावाला केंद्राकडून 20 कोटींचा निधी

जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व आरटीओ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील अपघात प्रवणक्षेत्र निश्‍चित करण्याचे काम हाती घेणार आहे.

-श्रीनिवास पाटील, खासदार

Edited By : Balkrishna Madhale