फलटण, बारामती, पुरंदर तालुक्यातील 13 जुगारी ताब्यात, 24 लाखांचा मुद्देमाल जप्त

रमेश धायगुडे
Saturday, 25 July 2020

पोलिस हवालदार अविनाश सुरेश शिंदे यांनी याबाबत फिर्याद दिली असून, सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार डी. आर. पाडवी अधिक तपास करत आहेत.

लोणंद (जि.सातारा) : डोंबाळवाडी (ता. फलटण) येथे जुगार अड्ड्यावर लोणंद पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 30 हजार 120 रुपयांची रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी व चारचाकी गाड्या असा एकूण 24 लाख 22 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, याप्रकरणी 13 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
'या' दाेन गावांतील महिला यंदा एकमेकांना शिव्या देणार नाहीत 
 
लोणंद पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, की डोंबाळवाडी गावच्या हद्दीत वीटभट्टी जवळच्या पत्र्याच्या शेडमध्ये तीन पानी पत्त्याचा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी व त्यांचे सहकारी सहायक पोलिस फौजदार देवेंद्र पाडवी, हवलदार ज्ञानेश्वर मुळीक, मल्हारी भिसे, फैयाज शेख, श्रीनाथ कदम, अविनाश शिंदे, केतन लालगे, होमगार्ड संतोष इंगवले, ओमकार कोळी, भिकू येळे, जयदीप भोईटे आदींनी घटनास्थळी जाऊन सुरू असलेल्या तीन पानी पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून ही कारवाई केली.

सातारा पोलिस दलावर कोसळला दुःखाचा डोंगर

या प्रकरणी मनोज मोहन कोकरे (रा. पणदरे, ता. बारामती), गणेश विठ्ठल कांबळे (रा. वडगाव निबाळकर, ता. बारामती), उमेश रमेश खरात (रा. लोणंद, ता. खंडाळा), रामचंद्र बबन कर्नवर (रा. गुळंचे, ता. पुरंदर), बाळासाहेब किसन मदने (रा. नीरा-वाघज, ता. बारामती), जगन्नाथ सखाराम मदने (रा. मिरेवाडी, ता. फलटण), रूपेश राहुल कांबळे (रा. निंभारे, ता. फलटण), महेश भालचंद्र भागवत (रा. बाळासाहेबनगर लोणंद, ता. खंडाळा), सुनील धुमसेन सोनवणे (रा. पिंपरे खुर्द, ता. पुरंदर), दत्तात्रय पोपट गायकवाड (रा. पणदरे, ता. बारामती), सुरेश अनंता भुजबळ (रा. वाल्हे, ता. पुरंदर), सागर सुरेश खंडाळे (रा. वडगाव -निंबाळकर, ता. बारामती), मनोज नरसिंग पवार (रा. सोमवार पेठ, ता. फलटण) आदी 13 जणांविरुद्ध लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्‍वभूमीवर साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला 'हा' निर्णय

जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातून बाहेर पडताच उदयनराजे म्हणाले, ते सहमत आहेत

त्यांच्याकडून व घटनास्थळावरून 30 हजार 120 रुपयांची रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी व चार चाकी गाड्या असा एकूण 24 लाख 22 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिस हवालदार अविनाश सुरेश शिंदे यांनी याबाबत फिर्याद दिली असून, सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार डी. आर. पाडवी अधिक तपास करत आहेत.
संपादन : संजय शिंदे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thirteen Arrested From Phaltan, Purandar, Baramati While Gambling In Satara District