पस्तीस तोळे सोन्यावर चिरंजीवाचाच डल्ला

‘शेअर’मधील नुकसानीमुळे मारला हात
Thirty five tolas of gold were stolen boy
Thirty five tolas of gold were stolen boy

कातरखटाव - कातरखटाव (ता. खटाव) येथे काल भरदिवसा झालेल्या सोन्या-चांदीच्या ऐवजासह रोख रकमेच्या जबरी चोरीचा तपास पोलिसांनी उलगडला आहे. या प्रकरणात फिर्यादी तानाजी देशमुख यांचा मुलगा तेजस याचाच या चोरीत सहभाग असल्याचेही तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीत झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे तेजस याने ही चोरी केल्याचे सांगितले.

येथील श्री. देशमुख यांच्या विठ्ठल मंदिराजवळ केशव निवास या घरातून काल दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भरदिवसा तब्बल ३५ तोळे सोन्यासह चांदीचा ऐवज व ३० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली होती. भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. घटनास्थळी ठसेतज्ज्ञ व श्वान पथकही तैनात करण्यात आले होते. या चोरीत चोरट्यांनी कोणताही पुरावा मागे न ठेवल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे राहिले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली.

पोलिसांनी घरातील लोकांची चौकशी व जबाब घेतल्यानंतर या प्रकरणात घरातील कोणाचा तरी हात असल्याचा संशय त्यांना येऊ लागला. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक शीतल पालेकर यांनी तेजस यास अधिक चौकशीसाठी मायणी पोलिस दूरक्षेत्रात नेले. त्या वेळी त्याच्याकडे अधिक चौकशी करता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखविताच त्याने ही चोरी केल्याचे मान्य केले.

एका मित्राच्या साथीने त्याने शेअर मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणूक केली होती. त्यामध्ये आलेल्या आर्थिक नुकसानीमुळेच तेजसने ही चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आणखी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख, संतोष तासगावकर, पालेकर, पोलिस हवालदार अमोल माने, दीपक देवकर, माळवे, बनसोडे यांनी तपास कामी परिश्रम घेतले. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com