

Strict Action Ahead for Whip Violators, Says Minister Patil
sakal
सातारा : ज्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी आमचे सदस्य फोडून भाजपने सुरुवात केली; पण शेवट आम्ही करणार आहोत. आम्ही काल राजकारणात आलेलो नाही. आमचे कुटुंब गेली ५० ते ६० वर्षे जिल्ह्याच्या राजकारणात आहे. अजून पुलाखालून बरेच पाणी जायचे आहे. भाजपने जे काही केले ते त्यांनाही भोगावे लागणार आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, असा सूचक इशारा मदत आणि पुनर्वसनमंत्री मकंरद पाटील यांनी भाजपच्या नेत्यांना दिला.