
Three former Karad corporators join BJP in Mumbai; senior leaders welcome them amid political buzz.
कऱ्हाड: शहरातील बहुचर्चित माजी नगरसेवकांचा भाजप प्रवेशाला अखेर आज मुंबईत मुहूर्त मिळाला. पालिकेच्या राजकीय वर्तुळात धक्कातंत्र देत भाजपच्या प्रदेश कार्यालयात दिग्गजांचा पक्षप्रवेश झाला. शिवसेना शिंदे गटाच्या स्मिता हुलवान, माजी नगरसेवक इंद्रजित गुजर, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष राजेंद्र ऊर्फ अप्पा माने, सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.