esakal | वन विभागाच्या कॅमेऱ्यात वाघाची छबी; तब्बल तीन वर्षांनंतर 'सह्याद्री'त पट्टेरी वाघाचे दर्शन

बोलून बातमी शोधा

Tiger
वन विभागाच्या कॅमेऱ्यात वाघाची छबी; तब्बल तीन वर्षांनंतर 'सह्याद्री'त पट्टेरी वाघाचे दर्शन
sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील संवर्धन राखीव वनक्षेत्रात वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात वाघाचा वावर कैद झाला आहे. तीन वर्षानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. यापूर्वी 2012 तर 2018 मध्ये वन विभागाच्याच कॅमेऱ्यात वाघाचे दर्शन झाले होते. त्यानंतर काल रात्री पुन्हा शिकार केल्यानंतर वाघाला वन विभागाच्या कॅमेऱ्याने कैद केले आहे.

सह्याद्री व्याघ्रच्या कॉन्झर्वेशन रिझर्व्ह क्षेत्रात वाघाचे दर्शन घडल्याचे छायाचित्र वन विभागाने प्रसिद्धीस दिले आहे. वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात काल रात्री वाघाचे छायाचित्र टिपल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे.सह्याद्री पर्वतरांगातील आठ वनक्षेत्रांना कॉन्झर्वेशन रिझर्व्हचा दर्जा दिल्यानंतर प्रथमच त्या भागात वाघाच्या अस्तित्वाचा पुरावा मिळाला आहे. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रखल्पातील वाघाचा भ्रमणमार्ग सुरक्षित आहे, हेच स्पष्ट होते. सह्याद्रीच्या पट्ट्यात साताऱ्यातील जोर, जांभळीच्या खोऱ्यासह विशाळगड, पन्हाळा, गगनबावडा, आजरा, भुदरगड चंदगडसह आंबोली ते दोडामार्ग या आठही वनपट्ट्यांना कॉन्झर्वेशनचा दर्जा दिला आहे.

img

Tiger

दहाव्यात अपयश, अकराव्या प्रयत्नांत बाजी; सूर्याच्यावाडीचा सुशांत 'सूर्या'सारखा तळपला!

त्यामुळे सह्याद्री पर्वतरांगातील वाघांचा भ्रमण मार्ग सुरक्षित राहणार होता. तो सुरक्षित आहे, याचाच पुरावा वाघाच्या छायाचित्राने दिला आहे. वन विभागाला संरक्षित वनक्षेत्रामध्ये वाघाचा वावर आढळला अशी माहिती मिळाली. त्यानुसार वन विभागाने व्याघ्र प्रकल्पात गोपनीयरित्या कॅमेरे लावले. त्यातील काल रात्री एका कॅमेऱ्याने नर वाघाचे छायाचित्र टिपले आहे, अशी माहिती कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. बेन क्लेमंट यांनी दिली. वाघाचे छायाचित्र त्याने केलेल्या शिकारीबरोबर टिपले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आयुष्यभर शेतीत काबाड कष्ट करून शरीराबरोबर मनानंही कणखर साथ दिली आणि मी पुन्हा..

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पट्ट्यात वाघाचा अधिवास सुरक्षित आहे, याची खात्री कॅमेऱ्याने टिपलेल्या छायाचित्राने दिली आहे. मात्र, सुरक्षास्तव वाघाच्या अधिवासाबद्दल सांगता येणार नाही. महत्त्वाचे म्हणजे सह्याद्री पर्वतारांगातील आठ कॉन्झर्वेशन रिझर्व्हमुळे वाघांचा भ्रमणमार्ग जोडला जावून तेथे वाघांचा संचार मुक्त सुरू आहे, हेही यातून स्पष्ट होत आहे.

डॉ. व्ही. बेन क्लेमंट, मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर

Edited By : Balkrishna Madhale