Karad Crime : खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून युवकाचा झोपेच्या गोळ्या खाऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न

खासगी सावकारांकडून रक्कम व्याजाने घेवून त्यापोटी ३३ लाख रूपये त्यांना परत दिले असतानाही त्यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून येथील एका युवकाने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
Crime
Crimesakal

- सचिन शिंदे

कऱ्हाड - शहरातील सात खासगी सावकारांकडून १८ लाखांची रक्कम व्याजाने घेवून त्यापोटी ३३ लाख रूपये त्यांना परत दिले असतानाही त्यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून येथील एका युवकाने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर येथील संजीवनी रूग्णालयातील अतीदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

युगल दिलीप सोलंकी (वय २४, रा. कऱ्हाड) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्याचे नाव आहे. शुभम उर्फ सोनू ढेब-पवार, शुभम मस्के, दादा उर्फ जीवन मस्के, ओकांर गायकवाड, निलेश पाडळकर, अर्थव चव्हाण, तेजस चव्हाण (सर्व रा. कऱ्हाड) अशी त्याला त्रास देणाऱ्या खासगी सावकारांची नावे आहेत. त्यांच्या खासगी सावकारी प्रतिबंधीत कायद्यासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहो. पोलिसांनी युगल सोलंकीची फिर्याद घेतली आहे.

सातपेकी चोघांना अटक झाली आहे. शुभम उर्फ सोनू ढेब-पवार, शुभम मस्के, दादा उर्फ जीवन मस्के, व तेजस चव्हाण (सर्व रा. कऱ्हाड) असी अठक झालेल्याची नावे आहे. त्यांना एख जानेवारी अखेर पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी ः युगल सोलंकीने २० डिसेंबर रोजी त्याच्या राहत्या घरात झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ती गोष्ट लक्षात येताच त्याच्या नातेवाईकांनी त्याला त्वरीत रूग्णालयात दाखल केले आहे. त्याच्यावर अतीदक्षात विभागात उपचार सुरू आहेत. रात्री उशिरा त्याचा गुन्हा पोलिसात दाखल झाला आहे. त्यानुसार सात जमांवर गुन्हा दाखल असून त्यातील चौघांना अठक करण्यात आली आहे.

युगले संबधितांकडून जुन २०२३ पासून खासगी सावकारी व्याजाने पैसे घेतले. त्यापैकी आजपर्यंत १२ लाख रुपये दिले आहेत. तरीही संबधित सावकार त्याच्याकडे पैसे मागत होते, त्याला दुकानात घरी जावून धमकी देत होते. युगलने वारंवार त्यांना घेतलेले पैसे परत दिले आहेत, असे सांगून व्यवहार संपल्याचेही स्पष्ट करत होता. युगलने शुभम मस्केला १२ लाख रुपये व्याजाचे दिले आहेत.

तुम्ही मला मुद्दल चार लाख ६१ हजार दिली होती. शुभम ढेबला ऑनलाईन वेळोवेळी रोख रक्कम परत केली आहे. त्याचप्रमाणे अन्य खासगी सावकरही दुकानात येवून तसचे फोनवरून वारंवार शिवीगाळ दमदाटी करीत होते. रक्कम ही लागलीच दे नाहीतर तुझे काही खरे नाही. असे बोलत होते. युलने ऑगस्ट २०२३ मध्ये त्याला चार ६१ हजार रूपये दिले.

ऑगस्ट 2023 मध्ये वेळोवेळी दोन लाख ५० हजार रुपये व सप्टेंबर २०२३ मध्ये चार लाख व पुन्हा पाच लाख घेतले होते. दिले होते. त्यातील निलेश पाडळकरचा हप्ता दर १५ दिवसाला ५० हजार होता. एक दिवस जरी उशिरा झाला तरी दिवसाला १० हजारांचांये दंड घेत होता. अथर्व चव्हाणला दोन लाख ५० हजार दिले होते. तरीसुध्दा तो दुकानामध्ये येवून फोनकरुन मला शिवीगाळ दमदाटी करीत होते.

त्यावेळी त्यांनी त्यांच्याजवळील दोन लाख व १५ दिवसाला ४० हजार व्याजाने दिले होते. त्यांना युगलने दोन लाख ८० हजार रोखीने परत केले. तरिही त्या लोकांचा होणारा त्रास असहाय्य झाल्याने युगलने डिप्रेशनमध्ये जावून आत्महत्या करायचा विचार केला. त्याने २० डिसेंबरला दुपारी राहते घरी जास्त प्रमाणात झोपेच्या गोळ्या खाल्या होत्या त्याचा मला जादा त्रास होवू लागल्याने नातेवाईकांनी त्याला लोकांनी संजीवन रूग्णालयात दाखल केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com