esakal | 'कृष्णा' निवडणुकीदरम्यान कडक लॉकडाउन का केला नाही?
sakal

बोलून बातमी शोधा

Strict lockdown

जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील आदेशापर्यंत कडक लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद राहणार आहेत.

'कृष्णा' निवडणुकीदरम्यान कडक लॉकडाउन का केला नाही?

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector Shekhar Singh) सोमवारपासून कडक लॉकडाउनची (Strict lockdown) घोषणा केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा बंद करण्यात आल्या आहेत. दीड वर्षापासून लॉकडाउनचे चटके बसत असल्याने व्यापारी, हातावर पोट असणारे हवालदिल झाले असतानाच आणखी कडक लॉकडाउनमुळे ते संतप्त झाले आहेत. पालिका व पोलिसांनी शहरातील अनेक रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यही संतप्त झाले आहेत. यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना निवडणुकीदरम्यान (Krishna factory election) कडक लॉकडाउन का केला नाही? त्यातून कोरोना होत नाही का?, असा सवाल व्यापारी, सर्वसामान्यांतून विचारला जात आहे. (Traders Oppose Strict Lockdown In Karad Taluka Satara Marathi News)

जिल्हाधिकारी यांनी पुढील आदेशापर्यंत कडक लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद राहणार आहेत. दीड वर्षापासून कोरोना संकटामुळे मोठ्या प्रमाणात लॉकडाउनचा फटका व्यापाऱ्यांना बसला आहे. त्यामुळे ते हवालदिल झाले आहेत. नुकतीच यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकी पार पडली. त्याचा निकालही नुकताच जाहीर झाला आहे. नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयाचे पुण्यात मोठ्या गर्दीत उद्घाटन झाले. त्यानंतर काही दिवसातच लॉकडाउन करण्यात आल्याने व्यापारी, हातगाडीवाले, हातावर पोट असणाऱ्यांनी निवडणुकी दरम्यान, कार्यालयाच्या उद्घाटनदरम्यान कोरोना होत नाही का? असा सवाल उपस्थित केला आहे.

हेही वाचा: साताऱ्यात लाॅकडाउनविरोधात व्यापारी आक्रमक

दरम्यान, पोलिसांनी लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्तेही बंद केले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्याही भावना तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे अनेक व्यापारी संघटना, पक्ष, विविध संघटना यांनी जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार यांना निवेदने देवून लॉकडाउन मागे घेण्याची विनंती केली आहे. मात्र, कऱ्हाड तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्याही जिल्ह्यात सर्वाधिक होवू लागली आहे. त्यामुळे शहरासह तालुक्याची चिंता कायम आहे.

हेही वाचा: विवाहितेला जबरदस्तीने पाजले विषारी औषध; पतीसह सासू, दिराविरुध्द गुन्हा

शेतमालालाही बसतोय फटका

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजपीला, पालेभाज्या ते विक्रीसाठी व्यापाऱ्यांना देतात. मात्र, त्यांच्याकडून काही व्यापारी हे मालाला उठाव नसल्याचे सांगुन त्यांच्याकडून कवडीमोल भावाने खरेदी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करुन पिकवलेल्या शेतमालातून त्यांचे गाडीभाडेही निघत नाही. त्यामुळे शेतकरीही हतबल झाले आहेत.

Traders Oppose Strict Lockdown In Karad Taluka Satara Marathi News

loading image