
Devotees celebrate Satoba Yatra in Takewadi with bhandara, gaji dance, and Dhangari ovya.
Sakal
दहिवडी : ‘डोंगरच्या हरीचं चांगभलं’च्या गजरात समस्त धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री सतोबा देवाची भव्य यात्रा टाकेवाडी (ता. माण) येथे हजारोंच्या उपस्थितीत उत्साहात झाली. गजी नृत्यासह पारंपरिक धनगरी ओव्यांचा फडासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी सतोबाचा डोंगर फुलून गेला होता.