Khambatki Ghat : भररस्त्यात बस बंद पडल्याने पुणे-सातारा महामार्गावरील खांबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी

पुणे-सातारा महामार्गावर आज विकेंड असल्याने वाहनांची संख्या सर्वाधिक आहे.
Pune-Satara Highway
Pune-Satara Highwayesakal
Summary

एसटी बस गरम होऊन दत्त मंदिर परिसरात बंद पडली. या ठिकाणी दोनच लेन असल्याने येथे वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागला.

खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावरील (Pune-Satara Highway) खांबाटकी घाटात (Khambatki Ghat) सहाव्या वळणावर असणाऱ्या दत्त मंदिराजवळ एसटी (ST Bus) बंद पडल्याने वाहनांची कोंडी होऊन खंबाटकी घाट एक तास जाम राहिला. यावेळी लहान मुलांसह अबालवृद्ध व नागरिकांना तीव्र उन्हाळ्याच्या झळा सोसाव्या लागल्या.

Pune-Satara Highway
महादेवराव महाडिकांचा मानसपुत्र म्हणून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली आणि त्यांच्याच विरोधात..; काय म्हणाले धनंजय महाडिक?

याबाबतची माहिती अशी की, पुणे-सातारा महामार्गावर आज विकेंड असल्याने वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. याचवेळी भर उन्हाळ्यात एसटी बस गरम होऊन दत्त मंदिर परिसरात बंद पडली. या ठिकाणी दोनच लेन असल्याने येथे वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागला.

Pune-Satara Highway
'निवडणुकीत मराठ्यांनी पाडणाऱ्याला इतक्या ताकदीनं पाडा की, पाडणाऱ्याच्या चार-पाच पिढीत कुणीच उभं राहिलं नसलं पाहिजे'

यावेळी अर्ध्यातासातच पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या, तर या वेळी काही वाहनाचालकांनी आपली वाहने विरुद्ध दिशेने बोगद्यामार्गे वळवली. यामुळे वाहतुकीची कोंडी अधिक होण्याची शक्यता होती. मात्र, तत्काळ महामार्ग पोलीस व खंडाळा वाहतूक नियंत्रण पोलिसांनी या वाहनावर नियंत्रण मिळवून, तसेच घाट माथ्यावरील एसटी बाजूला करून वाहने सुरळीत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यानंतर घाटमार्ग तासाभरात सुरळीत करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com