Satara News : पुणे-बेंगलोर महामार्गावर वाठारजवळ पाणी साचून वाहतूक जाम

महामार्गावरील वाठार परिसरात, कोल्हापूर नाका परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली.
Traffic jam on Pune-Bangalore highway near Vathar due to waterlogging police
Traffic jam on Pune-Bangalore highway near Vathar due to waterlogging police Sakal

कराड : कराड शहराचे तालुक्याला मुसळधार पावसाने आज दुपारपासून झोडपून काढले आहे. दुपारनंतर जोर अधिकच वाढला असून पावसामुळे शहरासह पुणे बंगलोर महामार्गावर पाणी साचून राहिले आहे. महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे जेथे रस्ता करायचा चालला आहे तेथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

महामार्गावरील वाठार परिसरात, कोल्हापूर नाका परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली. वाठार परिसरात महामार्गावर सुमारे दोन फूट पाणी साचल्यामुळे काही दुचाकी त्यात अडकून पडल्या. त्यामुळे वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात कोळंबा झाला. दरम्यान महामार्गाकडे च्या सेवा रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com